स्पर्श - भाग 2

(37)
  • 34.8k
  • 27.9k

तिकीट घेऊन सरळ विमानात बसलो ..काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर विमानाने झेप घेतली ..घरी पोहोचायला आणखी बराच वेळ लागणार होता तेव्हा डोळे मिटून घेतले आणि त्या क्षणात पोहोचलो ...सात वर्षांपूर्वी ..... मी अभिनव सरपोतदार ..नावातच खूप काही सापडत ..मला लहानपणापासूनच नवं- नवीन गोष्टी करण्यात खूप रस असायचा ..त्यामुळे अभिनव हे नाव अगदीच सार्थकी झालं ..बाबा घरी संगणकावर काम करत बसायचे तेव्हापासून त्याची ओढ लागली ..तो सुरू कसा होतो , त्याच्यावर लोक कसे बोलू शकतात असे बरेच प्रश्न विचारून बाबांना सतवायचो ..त्यांच्याकडे माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसलं की ते म्हणायचे तू संगणक अभियांत्रिकी कर म्हणजे तुला त्या सर्वच प्रश्नाची