तुझाच मी अन माझीच तू...भाग १

(43)
  • 43.3k
  • 2
  • 29.7k

तुझाच मी अन माझीच तू...भाग १ रात्री चा १ वाजून गेला होता... आभाने आई बाबा झोपलेत ह्याची खात्री करून घेतली.. मग ती तिच्या खोलीत आली आणि खोलीचे दार लाऊन घेतले.. तिचं टेन्शन वाढलं होत.. तिने एकदा कॅलेंडर पाहिले आणि शेवटी कपाटातून प्रेग्नसी कीट बाहेर काढली. आणि तिने प्रेग्नन्सी टेस्ट करायचा निर्णय घेतला.. तिचे हृदय जोरजोरात धडकत होते. तिला खूप टेन्शन आलं होतं. थोड रीलाक्स होण्यासाठी तिने राजस ला फोन लावला. त्याने सुद्धा फोन लगेच उचलला, "आभा.. इतक्या रात्री फोन? बर वाटतंय ना?" "टेन्शन आलाय...आत्ता प्रेग्नेन्सी टेस्ट करणारे.." "ओह.." राजस इतक बोलला आणि एकदम शांत झाला..