लावण्यवती

(16)
  • 9.1k
  • 2.8k

किंकाळ्या-आरोळ्या , आरडाओरडा रोजचंच झालंय हिचं, धड स्वत:ही जगत नाही आणि दुसर्यांना ही जगू देत नाही. काय पोरगी पदरात पाडले देवानं , वाटतं होतं पोरगी हुशार आहे, दिसायला सुंदर आहे. कोणतही स्थळ लगेच पसंत करेल. पण नाही..! बाईसाहेबांना शिकायचंय , नोकरी करायचीये, रात्री-अपरात्री बाहेर भटकायचंय. घ्या आता.., घडली ना जन्मभराची अद्दल. आता आपलही घराबाहेर पडणं सुध्दा कठीण झालंय, लोकं सहानुभूतीच्या नावाखाली हजार प्रश्र्न विचारतात, त्यांना तोंड देता-देता नाकीनऊ येत, त्यात खोटे गैरसमज करून घेणारे लोक वेगळेच, एैकतात एक आणि पसरवतात भलतंच, या सगळ्याचा वीट आलाय मला, जीव अगदी गुदमरून गेल्यासारखं वाटतोय. "अगं रंजना किती त्रास करून घेशील स्वत:ला ,जे झालं