कोणी बोलावले त्याला? (भाग 4)

(18)
  • 16.6k
  • 5
  • 8.6k

मागील भागावरून पुढे.... यथाअवकाश सगळे मुंबईला पोचले... येणारी पौर्णिमा अजून वीस दिवस लांब होती. त्याच्या आंत त्यांना सगळे सामान घेऊन चार दिवस आधी पुन्हा गावाला पोचायचे होते. किशोरच्या घरी मंदाकिनीला बघून एकदम गदारोळ माजला. सगळ्यांना वाटले की, तो लग्नच करून आला की काय. पण सगळ्यांना शांत करत त्याने मंदाकिनी कोण आणी काय परिस्थिती आहे ते समजावून सांगितले. तसें सगळे शांत झाले. आज पर्यंत त्याच्या आईबाबानां पण आपल्या गावाचा विसर पडला होता. पण अचानक असे प्रकरण समोर आलेले बघून सगळे हतबल झाले. काहीशे सावरत त्यांनी किशोरला ह्या सगळ्यातून बाजूला व्हायला सांगितले. पण किशोर बधला नाही. त्यामुळे आता जास्त कोणी काही बोलले नाही. झालेल्या पहिल्याच