अनिल जायला निघाला तेवढ्यात डॉक्टरने अनिलला आवाज देऊन कागदावर एक गोळी लिहली आणि ही गोळी जरा दहा दिवस झोपताना खा जरा डोकं शांत राहायला मदत होईल असे सांगितले. अनिलने बाहेरजाऊन औषधiच्या दुकानातून गोळी घेतली आणि थोडे पाणी मागून अडवाणी डॉक्टरने दिलेल्या गोळ्यांचा पहिला डोस तिथेच घेतला आणि गाडीला किक मारून गॅरेजकडे जाण्यास निघाला. नॉर्मल इ सी जि आणि अडवाणी डॉक्टरच्या बोलण्यामुळे अनिल कालपेक्षा आज खूपच चांगल्या मनःस्थितीत होता, रस्त्यातून जाताना चहाच्या टपरीवर नजर मारली तर शार्दूल आणि निखिल बहिरे उभे होते, निखिलने अनिलला आवाज दिला, “ओ गोरे साहेब” अनिल असाही थांबणारच होता आणि थांबला देखील, बाईक साईड स्टॅण्डवर उभी करून