लग्नाआधीची गोष्ट (भाग 13)

(25)
  • 7.7k
  • 3.7k

लग्नाआधीची गोष्ट (भाग 13) कालच्या प्रवासाचा थकवा व ही अनपेक्षित घटना यामुळे मी पुरता हादरून गेलो होतो. राऊत माझ्या जवळ आले व म्हणाले’ कदम ‘आम्हाला सगळीकडे लक्ष द्यावे लागते. कोण खर ?कोण खोट ? हे अगोदरच सांगता येत नाही. नंतर हवलदार गायकवाड यांना आवाज देऊन मला चहा द्यायला सांगितला.. फोरेन्सिक रिपोर्ट यायला जवळ जवळ एक दिवस लागणार होता असे मलायांच्याकडून कळाले .मला एक रात्र काढायला लागल्याने मला संजय व सपनाचा खूपच राग आला होता. दुसर्‍या दिवशी फोरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर समजले कि त्याचा मृत्यू विष खाल्ल्यामुळे झाला होता त्याने सकाळी 2 ते 3 च्या दरम्यान ग्लास मध्ये विष टाकून त्याचे प्राशन केले