प्रिय,आज मुद्दामच हे लिहिण्याचे उपद्याप... तुला आश्चर्य वाटत असेल ना माझ्यासारखी टेक्नोसेवी आणि सतत मोबाईलला चिकटून बसणारी व्यक्ती चक्क कागद आणि पेन घेऊन आपल्या मोडक्या अक्षरात काहीतरी खरडतेय... खरंय... पण आजकाल आपलं फारस पटत नाही ना रे... समोरासमोर बसून क्वालिटी डिस्कशन होण्यापेक्षा वादच जास्त होतात. दोघांचंही वय वाढलंय आणि वयानुसार येणाऱ्या अनुभवासोबत आपली मत बदलली आणि मग चालू झाले न संपणारे भांडण तंटे. मग ते माझ्या सतत बदलणाऱ्या नोकरीवरून असोत वा रात्री लेट येण्यावरून असोत वा शॉपिंग करण्यावरून... माझ्यासाठी तू नेहमीच ओल्ड स्कुल होतास. नोकरीत बढती पाहिजे तर आजच्या काळात एकाच कंपनीत राहून काही नाही होत हे तुला एकाच कंपनीतून