कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग-१३

  • 7.3k
  • 2.7k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग-१३ वा ----------------------------------------------------------------------- सक्सेस स्टोरी ऑफ ए कॉमन मैन “ या प्रोजेक्टला स्वतहा सागर देशमुख यांनी परवानगी दिल्याचे प्रिन्सिपलसरांनी सांगितले म्हणून या गोष्टीवर अनुशाचा विश्वास बसला आणि तिच्या मनात हे प्रोजेक्ट कसे करायचे ? याचे विचारचक्र सुरु झाले होते ..पण नेमकी सुरुवात कशी करावी ? याचा मोठाच गोंधळ तिच्या मनात सुरु झालेला होता . कॉलेजमध्ये सिनियर फ्रेंड्सना तिने याबद्दल चर्चा केली ,यातून थोडे फार उपयुक्त पडणारे पोइंटस तिला मिळाले खरे ..पण, तिचे फारसे समाधान होत नव्हते . हे काम सुरु करयचे तर आपल्याला अभिजितची मदत घ्यावीच लागणार ,आणि तो हे सगळ ऐकून घेतल्यावर