अंतःपुर - 1

(25)
  • 27.6k
  • 4
  • 16.3k

१. मित्राचा प्रस्ताव (फ्रेंड्स प्रपोसल)..."प्लिज डोन्ट किल हर... प्लिज...""नो..."गडद अंधारात आवाज घुमत होते... आधी पुरुषाचा व नंतर स्त्रीचा... त्यांच्या विनंतीचा उपहास करणारं न जाणो किती जणांचं विकट हास्य रात्रीच्या शांततेला फाडून आसमंत दुमदुमून टाकत होतं...आणि अचानक एका गन शॉटने एक कलेवर जमिनीवर पसरलं गेलं. आणि नंतर शॉटगनच्या रिकॉईल पॅडच्या फटक्याने आणखी एक शरीर जमिनीवर आदळलं... धाड्...."नाही!..." शक्ती ओरडत उठला! सत्य परिस्थिती अवगत व्हायला त्याला थोडा वेळ गेला... हे... हे... स्वप्न होतं का...? नाही! ही एक आठवण होती! ट्विस्टेड् असली तरी आठवणच! जी रोज शक्तीला सतावत होती... याचमुळे त्याने ठरवून टाकलं होतं... की काही झालं तरी रात्री झोपायचं नाही... किंबहुना मुळी झोपायचंच नाही... पण