शेतकरी माझा भोळा - 11

  • 7.3k
  • 2.7k

११) शेतकरी माझा भोळा! कोंडबा मेला, सखीची विटंबना झाली. तिला कलाकेंदराच्या मालकान धंध्याला लावलं तव्हा खरं तर गणपत आन यस्वदावर दुक्काच आबाळ कोसळलं, त्यातच त्येंचा बी अंत व्हवावं पर ज्यांच्या भाळी जित्तेपणी मरण जगायचं सटवीन लिवलेल ऱ्हाते. त्येंची अशी सुकासुखी सुटका व्हत न्हाई. कोंडबानं सोत्ताचं दुक गिळलं पर यस्वदीला संबाळायला लै दिस लागले. सोयरे दोन-चार रोज ऱ्हाऊन निघून गेले. पाच-धा रोज येड्यावानी वागणारी यस्वदा आपुआप ताळ्यावर आली आन् गणपतला त्या दुकात तेव्हढच सुक गावलं. पोटाच्या भुकेनं डोकं वर काढताच दोग बी