प्रपोज - ८

(12)
  • 10.2k
  • 1
  • 4k

हो ती म्हणाली होती घरचे सर्व तीला मेंटल हॉस्पीटल मधे भरती करायला आलेत.. आणी तो डॉक्टरही तेच म्हणाला होता...तो डॉक्टर......?भेटायलाच हव......*****"नमस्कार...... आत येऊ का.....?" मी केबिनच दार उघडत विचारल..." हो.... या ना.... बसा..." मला आत बोलवल आणी आपल्या हातातले रिपोर्ट पाहू लागले... अगदीच छान एसी केबीन होती.. समोर टेबलवरच्या जाड आणी रूद काचेवर हाथ ठेवत माझी नजर डॉक्टरांच्या खुर्चीमागच्या शरीररचनेच्या आकृतिवर स्थिरावली... काय काय साहीत्या फिटींग करतो परमेश्वर... " बोल.... काय मदत करू तुझी....? " रिपोर्ट खाली ठेवत म्हणाले"मला ओळखल असेल तुम्ही...?" त्यानी किंचीत भुवया आकसुन पाहल आणी डोळ्यांवरचा चश्मा काढत टेबलवर ठेवला...."हो..... ओळखल.....त्या वेड्या मुलीचा मित्र ना..."" तीला वेडी कशावरून