आजारांचं फॅशन - 7

  • 5.3k
  • 1.9k

“ओ जेवायला वाढू का” सविताने किचन मधून आवाज दिला. अनिलचे लक्षच नव्हते, त्याला सविताचा आवाज किंबहुना ऎकायला आलेला नसावा. सविता स्वतःच्या ओढणीला हात पुसत बाहेर आली आणि अनिलला बघून समजून चुकली कि काय सुरु आहे ते. “काय झालं ओ, आता तर नीट होते” सविताने अनिलच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवून विचारले. अनिलने मान सविताकडे फिरवली आणि दबक्या आवाजात बोलला. “छातीत दुखतंय डाव्या बाजूला” “काही नाही ऍसिडिटी असल, ऍसिडिटीची गोळी खा अन जेवून घ्या” सविताने खूप प्रेमाने आणि आपुलकीने सांगितले. “दे एक गोळी त्या डब्यातून” अनिलच्या औषधांचा एक वेगळा डबाच होता, त्यात खोकल्याच्या, सर्दीच्या, ऍसिडिटीचा, बी पी च्या, पोट दुखण्याच्या, जेवण