माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 25 - अंतिम भाग

  • 6k
  • 2
  • 2.1k

२५ धक्कादायक धक्का! लग्नानंतर एखादा महिना झाला असेल नसेल.. आम्ही हनिमूनवरून परतलेलो. वै आणि माझी नव्याची नवलाई होतीच. माझे मूलभूत चिंतन मला आजही सांगते.. हनिमूनला फार दूर किंवा महागड्या ठिकाणाची नसते गरज.. नव्या नवऱ्या नि नवरीच्या नवलाईची नशाच पुरेशी असताना अगदी छोटेशी जागाही पुरेशी असते.. पण अर्थात आम्ही दूर मॉरिशसला जाऊन आल्यावर हे मी सांगतोय! असो.. तर आम्ही परतलो होतो.. वै मराठी अगदी आवडीने शिकत होती. आईच्या माहेराशी कनेक्शनमुळे की कोणास ठाऊक पण तिच्या भाषेबद्दल आईने उदार धोरण ठेवले होते. वै च्या मोडक्या मराठीला आई आपल्या तोडक्या इंग्रजीत उत्तर देई. सगळे कसे मजेशीर होते. रोज वै आता