कल्लोळ

  • 11.7k
  • 3.6k

आईंना घेउन आले आत्ता हाॕस्पीटलमधे. काय होतंय काय माहीत ? किती जोरत पडल्या त्या बाथरुममधे. डोक्यातून रक्त खूप वाहत होतं . पाहून घाबरलेच मी. घरी कोणीच नाही, अर्थात रोजच कोणी नसतं म्हणा. मी आणि आई दोघीच असतो नेहमी. नेमकं मलाही काय बुध्दी झाली स्वयंपाकघरात जायची? भाजी थोड्या वेळाने फोडणीला टाकली असती तर काय बिघडलं असतं? पण आईंना आंघोळीला पाणी दिलं, स्टुलवर बसवलं, दार उघडंच ठेवून मी स्वयंपाकघरात गेले. आंघोळ झाली की पोथी वाचून जेवायलाच बसतात त्या. आज त्यांच्या आवडीची लाल भोपळ्याची , त्यांच्या नागपुरी भाषेत बाकरभाजी, करायची होती. त्यांची अंघोळ झाली की त्यांना खोलीत बसवून कपडे दिले की माझं