विदुला आज सकाळी लवकरच उठली. चटकन आवरून तिने आॅफिस गाठले. तिच्या अत्यंत महत्वाच्या प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनचं आज सादरीकरण होतं तेही कंपनीच्या सीईओंच्या उपस्थितीत. तिने खूप मेहनत घेतली होती या प्रोजेक्टसाठी. विदुलाने सर्व तयारी केली. थोड्याच वेळात संपूर्ण टीम सीईओंसह मिटींग रूममध्ये दाखल झाली. विदुला थोडी नर्व्हस होती पण कालच आरूषने तीला धीर दिला होता आणि तो तीला हे ही म्हणाला होता की, "मला खात्री आहे तुझं प्रेझेंटेशन एकदम बढिया होणार. आणि तू बाॅसकडून कौतुकाची थापही मिळवणार." हे आठवताच एक आगळाच आत्मविश्वास तिच्या डोळ्यांमध्ये तरळू लागला आणि विदुलाने प्रेझेंटेशनला सुरूवात केली. एक तास अव्याहत ती बोलत होती आणि मिटींग रूममधील सर्व मंडळी