कादंबरी- जिवलगा ..भाग -२७ वा .

(32)
  • 16.4k
  • 1
  • 9.4k

कादंबरी – जिवलगा भाग -२७ वा ---------------------------------------------------------------- सोनिया आणि अनिता या दोन्ही मैत्रिणींच्या कहाण्या ऐकून नेहा मनातून खूप दुखी होऊन गेली होती . गेले काही महिने या दोघींच्या सोबत ऑफिसमध्ये काम करतांना कधी या दोघींच्या बोलण्यातून स्वतःच्या आयुष्य बद्दल कधी तक्रार , किंवा आयुष्याचे रडगाणे ऐकवून त्यांनी स्वतःच्या दुखाचे कधी प्रदर्शन केले नव्हते . एका अर्थांने ..उध्वस्त झालेल्या आयुष्याला समर्थपणे त्यांनी मोठ्या हिम्मतीने सामोरे जात आपल्या जगण्याची लढाई सुरूच ठेवलेली होती . सोनिया आणि अनिता ..दोघीजणी अगदी कणखर मनाच्या झाल्या आहेत ..जीवनात त्यांना खूप वाईट अनुभवातून जावे लागले आहे, त्यांच्या ..जिवलग माणसांनी ..मानसिक धक्के दिलेत ..तरी कच न खाता ,