मंतरलेली काळरात्र (भाग-१)

  • 14.1k
  • 5.1k

मंतरलेली काळरात्र भाग-१. अचानक लाईट गेली....! सगळीकडे अंधार पसरला कोणालाच कोणी दिसत नव्हते इतका भयाण अंधार जणू डोळण्यांची दृष्टी नाहीशी व्हावी.. काही क्षणासाठी इतका अंधार आम्ही घरातील सर्व जण जेवत होतो आई, मी माझा मोठा भाऊ(दादा) आणि आमची आजी..माझे वडील मिलिटरी मध्ये होते,ते आताच काही महिन्यांपूर्वी येऊन गेले होते, आता घरात अंधार पसरला होता आणि तेव्हा आई म्हटली घाबरू नका मी मेणबत्ती लावते.जाग्यावर बसून रहा..!आई ने कशी तरी चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात मार्ग काढत काडेपेटी सापडत मेणबत्तीचा घरात शोध घेऊ लागली.इकडे आम्ही दोघे भाऊ जाग्यावरती बसून होतो बाहेर सोसाट्याचा वाऱ्याचा आवाज आता माझ्या कानावर स्पष्ट येऊ लागला मनात भीती निर्माण झाली होती असा