दोन टोकं. भाग १०

  • 12k
  • 6.8k

भाग १० दुसऱ्या दिवशी परीला मस्त नवीन ड्रेस घातला, बांगड्या घातल्या. गजरा लावला. परी सोबत सगळेच नटले होते. मग आता नटल्यावर फोटोशुटचा कार्यक्रम तर झालाच पाहिजे ना ?. सगळ्या जणी भरपुर पोझ देऊन फोटो काढत होत्या. विशाखा एकटी होती जी नटलीही नाही आणि फोटो काढिला पण गेली नाही. सायलीच जवळ येऊन म्हणली, " सगळ्यांनी छान छान ड्रेस घातलेत मग तुला काय प्रॉब्लेम आहे ?. " " मला आवडत नाही ? " मोबाईलमधलं डोक वर न काढता विशाखा ने उत्तर दिलं. " आवडत तरी काय तुला ?. शॉपिंग नाही आवडत, मेकअप नाही आवडत, नटायला नाही आवडत........ मग आवडत तरी काय ?? " " झोपायला ??. प्रचंड आवडतं