शेतकरी माझा भोळा - 9

  • 7.6k
  • 2.9k

९) शेतकरी माझा भोळा! टरकाची वाट फाता फाता चार-पाच दिस निघून गेले पर त्यो आलाच हाई. गणपत रोज फाटे मारुतीच्या दर्शनाला गेल्यावाणी कार्खान्यावर जायचा. दिसभरात कव्हातरी मुकीरदमाची गाठ पडायची. मुकीरदम त्येला ग्वाड ग्वाड बोलून पाटील-रावसाब म्हून वाटेला लावायचा. सांच्याला दोन-तीन टरक धाडून देत्यो आस रोजच बोलायचा. घरामंदी यस्वदाची किरकिर वाढली व्हती. सावकार बी पैक्यासाठी तंग करु लागला. जाता-येता कलाकेंदराचा मालक पैक्याच काय झाल म्हून ईचारायचा. कोंडबा रात-रात घरी येत न्हवता. आश्येच आठ-धा दिस गेले. त्या सांच्याला गणपत मारुतीच्या