काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 3

  • 6.8k
  • 2.9k

भाग ३तो शांत जमिनीवर पडला होता. नुकत्याच झालेल्या त्या द्वंदचे निशान जमिनीवर होते. त्याच्या शरीरावर जागोजागी जखमेचे निशान होते .संपूर्ण शरीर रक्ताने माखले होते पण त्याचे डोळे आपल्या पराक्रमाची साक्ष देण्यास उघडे होते .मित्रांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांच्या लाडक्या वाघाने काळराजाच्याही नाकी नऊ आणले होते .सर्वांचे डोळे पाणावले होते. आपल्या मित्राची अशी करुन अवस्था पाहून सर्वांना गहिवरुन आले .थोडावेळ कोणालाही काहीच कळेना कि काय म्हणावे आणि काय बोलावे.अचानक भयानक शांतता तिथे पसरली होती. सुई पडेल तर त्याचाही आवाज येईल अशी नीरव शांतता तिथे पसरली होती आणि कोणीच कोणाशी बोलत नव्हते. फक्त सर्व एकमेकांकडे पाहत होते आणि एक नजर विशालच्या पार्थिव देहाकडे