सहनसिद्धा

  • 6.9k
  • 1
  • 2.1k

मंजिरी आज जरा वैतागलीच होती. बाळ रडत होतं. नवरा, सासू, नणंद कोणाचच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. स्वैंयपाकात कोणी मदत करत नव्हतं. गॅसवर एकीकडे दूधावर जेमतेम साय धरेली होती आणि कुकरची शिट्टी होण्याच्या बेतात होती. तिने विळीवर सपासप भाजी चिरणाऱ्या हाताचा वेग आवरला. गॅस बंद करुन बाळाला छातीशी कवटाळत तिथेच चार बाय चारच्या स्वैंयपांक घरात फतकल मारुन बसली. "हे काय? अजून डब्बा झाला नाही?" नवर्‍याने ओला टॉवेल तिथेच दिवाणावर टाकत स्वैंयपाक घरात डोकावत विचारलं "उशीरा उठलं तर हे असचं होणार ना." सासू टी.वी चा आवाज मोठा करत म्हणाली. "काय कट कट आहे रोजची...." नवरा "म्हणजे मला पण बाहेरच खावं लागणार वाटतं......" पस्तीशीतली