लग्नाआधीची गोष्ट (भाग 10)

  • 8.7k
  • 1
  • 3.7k

लग्नाआधीची गोष्ट (भाग 10) ऑक्टोबर(2 वर्षानंतर परत)- एवढ्या दिवस मला लिहायला काही जमल नाही. काही विशेष घडलेच नाही. कॉलेज व रूम… तीच रात्र ,तीच सकाळ…. काही दिवसांनी इंटर्नशिप सुरू होणार अस समजलंय. मला पुण्याला पिंपरी चिंचवडला वाय. सी. यम मध्ये जाव लागेल. सहा महिने कसे जातील तिकडे या मैत्रिणी सुद्धा नसणार. असणार तो फक्त एकटेपणा. आता कुठे मी थोडीशी येथे रमायला लागली होती. फेब्रुवारी- स्मृती मधून संजयच्या आठवणी मधून बाहेर आले होते. तोच आज सूरज नावाचा एक जण भेटला. त्याच्याशी बोलून खूप बरे वाटले. नंतरसुद्धा योगायोगाने हॉस्पिटल मध्ये आमची भेट झाली व त्याने प्रपोज केला. संजय पासून खूप दिवस मी लांब होते. पण आता तसंपण तो मला भेटणार नाही. सूरजला खूप दिवस मी टाळत होते पण तो मात्र मनापासुन प्रेम करत होता त्या दिवशी मी त्याला हो म्हणाले. मार्च- मी परत घरी येऊन जवळ जवळ एक महिना झाला होता. सूरज व मीदररोज एकमेकांशी बोलतो. आज पुन्हा पुण्याला जायला निघाले तेव्हा अचानक संजयने एस .टी थांबवून मला खाली बोलावले व मला मिठी मारली. कारण तो खूप दिवसातून मला बघत होता. मी त्याला मागे ढकलून दिले. मी त्याला म्हणाली, मी आता तुझ्यावर प्रेम नाही करत मी दुसर्‍या एका वर प्रेम करते . त्याला हे सहन झाले नाही ……त्याने माझा हात धरून माझ्या कानाखाली मारली व मला म्हणाला, मी तुझ्यासाठी पोलिसांचा मार खाला, जेल मध्ये गेलो, माझ्या गावांत पण माझी बदनामी झाली आणि तू... नंतर तो निघून गेला पण माझ्याकडे एक प्रश्न राहून गेला मी हे का केल? सूरजला मी आवडते गाणे विचारले तर त्याने मला मी ‘आफरिन’ हे गाणे दररोज ऐकतो अस सांगितल. मी पण ते गाणे ऐकल इतके अप्रतिम होते ते की काय सांगू.... मी माझ्या डायरीच्या पहिल्याच पानावर ते गाणे लिहिले. जेव्हा जेव्हा डायरी उघडते तेव्हा ते एकदा म्हणावेसे वाटते आणि गाणे चालू असताना मला फक्त सूरज दिसतो का कुणास ठाऊक? संजय त्यामधे नसतो. सूरजने त्याला समजल्यावर मला सांगितले तू दोघांमध्ये कोणाचाही स्वीकारकर. पण सूरज ला रिजेक्ट करण्याचे काहीच कारण मला सापडत नव्हते. मी विचार न करता सूरज ला तुझा स्वीकार केला ,असे त्याला सांगून टाकले. मी याआधी सूरजला खूप वेळा म्हणाले होते की मी ज्याच्यावर प्रेम करेल त्यालाच हे लव असलेले लॉकट देईन. उद्या मी त्याला भेटायला जाणार आहे. तेव्हा मी हे लॉकेट व माझा भूतकाळ असलेली डायरी त्याला देईन. NOTE: माझ प्रेम कोणावर आहे यापेक्षा माझ्यासाठी कुणी काय गमावलं याचा विचार करून मला सध्या संजयकडे जावेच लागेल. सूरज तुला काय वाटेल माहीत नाही. कदाचित मी चुकले असेल पण मला क्षमा कर. मी त्याच्याकडे जात आहे. माझ काही चुकल का ? कधीकधी