रावसाहेब आज दिवसभर बेचैन होता. गावातील बड्या आसामीपैकी एक म्हणजे रावसाहेब. गडी देशी नाही मात्र विदेशी बाटल्यांचा मोठा शौकीन. फिरायला म्हणून कुठं बाहेर गेला की त्याची बॉक्सनेच खरेदी. सगळे विदेशी प्रकार गड्याचे तोंडपाठ. नुसता बाटलीचा रंग बघून पाण्याबरोबर घ्यायची की सोड्याबरोबर की नुसतीच याचा ठोकटाळा त्याचा कधी चुकत नसे. एकपरी जेवण नरम असले तरी गडी चालवून घ्यायचा मात्र पेय कसे अंगात शिरशिरी आणणार हवं हे एकच त्याचे सूत्र. विदेशी घेत असला तरी गडी उपद्रवी मात्र न्हवता.जवळजवळ दोन महिन्याहून अधिक काळ लोटला होता. त्याला नेहमीसारखी मनसोक्त विदेशी बाटली काही हाती लागली न्हवती. त्यामुळे गडी अगदी बेचैन झाला होता. त्याचे कशावर लक्ष