भिजवणारा पाऊसघड्याळात तीन वाजले होते. बाहेर काळेभोर आभाळ जमू लागले होते. पाहता पाहता सर्व ढग एकत्र झाले आणि पाऊस सुरू झाला. तसं त्याच्या मनात चलबिचल चालू झालं. सकाळी शाळेला निघत असतांना निरभ्र आकाश होतं. पाऊस पडेल असा कोठेही अंदाज नव्हता. तसं हवामान खात्याने अंदाज सांगितलं होतं की, पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता म्हणून. पण त्याने त्या हवामान खात्याच्या अंदाजाकडे नजरअंदाज केला आणि सोबत रेनकोट न घेता शाळेला निघाला. मनातल्या मनात स्वतः विरुद्ध चिडून उठला. गेल्या दहा दिवसापासून रोज रेनकोट सोबत होतं पण पाऊस काही पडला नाही. नेमकं आजच रेनकोट सोबत नाही आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. शाळा सुटेपर्यंत