निर्णय - भाग ७

(25)
  • 8.9k
  • 2
  • 3.4k

निर्णय - भाग ७" हजार वेळा सांगून झाली माझं... मला कुठेही जायचं नाही " ती वैतागली. ' आधीच माझ्या आयुष्याचे बारा वाजले असताना, ह्या लोकांना फिरायचं सुचतय.' ती मनातच चरफडली. ' तो तसा आणि हे... हद्द झालीय.' वैतागून पाय आपटत ती आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली." का ग छळते तू तिला..?" मगापासून तीच डोकं खाणाऱ्या तिच्या चुलत बहिणीवर आई जरा चिडलीच. " माहितेय ना तुला..." आईचा स्वर गदगदला. काळजातली धग आवंढा बनून गळ्यात दाटली. " म्हणूनच तर तिला बाहेर न्यायचं म्हणतेय... जरा बर वाटेल ना. नुसती कोशात गुरफटून बसलीय..... मला नाही बघवत अस तिला " आईची अवस्था बघून बहिणीच अवसानच गळल.