आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (27) शेवटचा पेपर संपला आणि मी कुणाशीही न बोलता, कुणालाही न भेटता धावत खोलीवर आलो होतो. दुसऱ्या दिवशी गावी जायचंहोतं. आजीआजोबांच्या प्रश्नांची उत्तरं काय द्यायची? पुन्हा खोटं बोलणं आलंच पण निकाल खोटा बोलणार नव्हता.दुसऱ्या दिवशी जायची तयारी करत होतो. सुमैया भेटायला येईल पण काल परीक्षा संपल्यापासून दिसलीच नव्हती. मनाशी ठरविलं होतं. तिला भेटल्याशिवाय गावाकडं जायचं नाही.इतक्यात अनिल माझ्या खोलीवर धावत खोली शोधत आला. ‘‘प्रशांत लवकर आवर तुला आताच्या आता गावी जायला हवं.’’ मी पूर्णपणे घाबरून गेलो. ‘‘अरे, पण का?’’ ‘‘आजीची तबयेत पुन्हा बिघडलीय. तुला लवकरात लवकर गावी बोलवलंय चल लवकर.’’ तसं मी साहित्य घेतले