#हा_मार्ग_नियतीचा प्रेमात पडलेलं माणूस सुंदर दिसते असं म्हणतात ते निधीकडे पाहून खरं वाटायला लागलं होते. दिवसेंदिवस निधी आणि सोमेशच्या प्रेमाच्या चर्चा कॉलेज मध्ये ऐकायला मिळत होत्या. त्यांचं प्रेम हळूहळू वाढत होतं.तरुण मुलामुलींनी प्रेमात पडणं काही गैर नव्हतं. पण आजूबाजूचा समाज मात्र या गोष्टीकडे चांगल्या नजरेनं बघत नाही. आरुषी व निधी या दोघी मैत्रिणी जिथे रहात होत्या ते नावापुरतंच शहर होतं. प्रत्यक्षात होतं मात्र जास्त लोकवस्ती असलेलं खेडेगावंच !! सर्व जुन्या परंपरा, रीतिरिवाज यांना त्या ठिकाणी अजून खुप महत्व दिलं जायचं. सोमेश आरुषीच्या घराजवळ राहत असलेला मुलगा आणि निधी आरुषीची जिवलग मैत्रीण दोघेही एकमेकांना पसंत करू