घुंगरु

  • 9.8k
  • 2.4k

जिथे जाणं सभ्य लोकांचं लक्षण नाही असं फक्त बोललं जातं तिथे तो नेहमीच यायचा. त्यानं तिला एकदा बाहेरच्या पडवीत मस्ती करताना बघितलं. त्यानंतर कधी इतरांबरोबर नाचण्याची तालीम करतांना, त्यात तिच्या पायांतील स्वछंद बागडणारे घुंगरु, तिचं खळखळून हसणं, कधी उगाच नखरा करत बघणं, मुक्या प्राण्यांना जीव लावणं.... हे सारं बघुन त्याच्या मनात घर केलेली ती आज निशब्द होती.बिछान्यावर पहुडलेल्या गुडघ्यातुन दुडलेल्या तिच्या गोऱ्या पायात घुंगरू अधिकच सुंदर दिसत होते. कमरेपासुनवरील शरीर तिनं जवळच असलेल्या उशीच्या ढिगार्‍यावर लोटुन दिलेलं , चेहर्‍यावर नेहमीपेक्षा जास्त तेज होते , डोळे बंद असले तरी ते कसला तरी विचार करत आहेत हे स्पष्ट