कोणी बोलावले त्याला ? (भाग 2)

(16)
  • 16.9k
  • 2
  • 9.6k

मागील भागावरून पुढे.... संपत ने किशोरचा हात सोडला आणी घाबरून दोन पावले मागे गेला. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट दिसत होती. प्रकरणाची नजाकत बघता आता श्यामलाच काही करणे भाग होते. " किशोर ! चल आपण फार्म हाऊस वर जाऊ. तिथे जाऊन आपण बोलू ? "" नको..." किशोर म्हणाला. पण त्याची नजर अजून पण दरवाज्यावर स्थिर होती. डोळ्यात स्वप्नाळू भाव होते. जणूकाही तो कोणत्या वेगळ्याच दुनियेत होता. " किशोर ! " श्याम ने एक जोरदार हाक मारली... आणी किशोर भानावर आला. " चल... आपण फार्म हाऊस वर गेल्यावर बोलू... मला पण जाणून घ्यायचे आहे. नंतर हवं तर आपण परत येऊ पण आता इथून चल...." श्याम