कादंबरी -प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग-११

  • 8.9k
  • 2
  • 2.9k

कादंबरी – प्रेमाविण हे व्यर्थ हे जीवन .. भाग-११ वा -------------------------------------------------------------------------------- अनुषा मैत्रिणी बरोबर कॉलेजमध्ये आली .कॉलेजच्या तासात सर काय शिकवत आहेत ? याकडे तिचे लक्षच लागत नव्हते . अलीकडे काही दिवसापासून तिच्या मनात आणि डोक्यात एकच विचार चालू असायचा - तो म्हणजे - “अभिच्या परिवारात असलेला दुरावा , त्यांच्यात झालेले मन-भेद ,एकमेकांच्या विषयी मनात असलेला रुक्ष कोरडेपणा ,किती विचित्र आहे ना सारे . अनुशाच्या मते - “ जिवंत माणसांची नाती कशी रसरशीत असावीत “, आणि आपल्या अभिच्या जीवनात ,घरात , घरातल्या माणसात एक निर्जीवपणा आहे , अर्थहीन ,उद्देशहीन आयुष्य जगत आहेत “असेच यांच्याकडे पाहून वाटावे . अभिकडून आत्तापर्यंत जितके काही