माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 22

  • 5.4k
  • 1
  • 1.7k

२२ वैदेही गमन! कृत्तिका उभी समोर नि मी जांभई देत बसलोय. आजूबाजूचे काही समजेना मला. वैदेही कुठे असेल? निघून तर गेली नसेल ना? मी डोळे चोळत कृत्तिकाकडे पाहात म्हणालो, “बाकी कोणी दिसत नाहीत?” “बाकी म्हणजे? आहेत ना.. सगळे आहेत.. काकू आहे.. काका.. आई.. बाबा सगळे आहेत..मी आहे, तू ही आहेस.” का कोणास ठाऊक मला तिचा आवाज थोडा कडवट वाटला. न राहवून मी विचारले .. “आपण सगळे आहोतच पण बाकीचे गेस्ट..?” अजूनही मी वै बद्दल थेट विचारू धजत नव्हतो.. “आहेत की.. ते मंगू मामा नि तात्या आहेत. झालेच तर रत्नागिरीच्या मावशी आहेत. राजापूरच्या आत्याबाई आहेत. सगळे आहेत. बाजूच्या घरात.