आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (26) मला काहीच समजेना. सरांची परवानगी घेतली आणि गावची एस.टी.धरली. आजीला निपाणीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मी पुरता घाबरू गेलो होतो. आजोबांशिवाय जवळ कोणीच नव्हतं. आजीला सलाइन लावले होते. नुकतीच तिला झोप लागली होती. मी आजोबांकडे आजीच्या तब्येतीची विचारपूस केली. ‘‘असं अचानक कशी आजारी पडली आजी?’’ ‘‘काय सांगायचं पोरा, बरं वाटत नसताना घरात बाजाराला पैसा नाही म्हणून कामाला गेली. आजारी असल्याचं मला लवकर सांगितले नाही. दवाखान्याला कुठला पैसा आणायचा म्हणून अंगावरच काढली. जास्त त्रास व्हायला लागल्यावर मग सांगितले. ताप-थंडी वाढला होता. म्हणूनच एवढ्या मोठ्या हॉस्पिटलात घेऊन यायची वेळ आली.’’ ‘‘मग पैशाचं कसं काय जोडणी