आजारांचं फॅशन - 2

  • 6.3k
  • 3k

अनिलच्या घरापासून मनोज कापडणेचे घर फार फार तर २०० ते ३०० मीटर अंतरावर आणि मधे नाका, जिथे मित्र मंडळी जमून चहाच्या टपरीवर स्वतःच्या घरातल्या तेल मिठा पासून ते डोनाल्ड ट्रम्प च्या घराच्या विटापर्यँत जेवढ्या शक्य तेवढ्या गप्पा मारत बसायचे. अनिल नाक्याजवळ पोहोचला आणि पहिली गोष्ट त्याच्या नजरेला पडली ती म्हणजे १० बाय १५ फुटाचा एक मोठा मनोज कापडणेचा हसरा फोटो लावलेला श्रद्धांजलीचा बॅनर, 'भावा सारखा मित्र हरपला, असा कसा हसता हसता सोडून गेलास, भावा तू परत ये' 'मनोज कापडणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली' बॅनर वरचा मनोजचा हसरा चेहरा आणि लिहिलेले काळे अक्षर वाचून अनिलचा चेहरा पांढरा ठप्प पडला. "ये आन्या" अनिल