परवड भाग 1

(14)
  • 20.8k
  • 1
  • 12.9k

आश्रमाकडे... अरविंदाला आज पहाटेच जाग आली.तो रात्रभर तसा तळमळतच होता.पहाटे थोडाफार डोळा लागला तेव्हढाच, नाहीतर तो रात्रभर जागाच होता. “श्रीहरी विठ्ठला पांडुरंगा!” नेहमीप्रमाणे पांडुरंगाच्या नावाचा गजर करत त्याने आकाशाकडे पाहून हात जोडले. आजचा दिवस त्याच्यासाठी फार मोठ्या परीक्षेचा होता.आज खूप घाई करावी लागणार होती.आश्रमातल्या लोकांनी सकाळी दहाची वेळ दिलेली होती. वसंताला घेऊन दिलेल्या वेळेत आश्रमात पोहोचा असे आवटे साहेबांनी-आश्रम चालकांनी, चार चार वेळा बजावले होते. अजून स्वत:च सगळ उरकून वसंताला उठ