एक दिवाळी आठवण

  • 8.5k
  • 2
  • 2k

दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो दिवाळी फराळ, फटाके, आणि सगळीकडे आनंदी वातावरण.दिवाळी म्हणजे आठवणी... त्यातलीच एक म्हणजे.....तेव्हा मी तिसरी-चौथीला असेल. साल २००३-०४ मधला काळ. खुप वर्ष नाही झाली पण ती दिवाळी आणि आताची दिवाळी वेगळी आहे.. असो.तर झालं असं की, मी आणि माझ्या बहिणी असे मिळून आम्ही दिवाळीतला फराळ करू... शाळेला सुट्ट्या लागल्या की, आधी साफसफाई आणि नंतर फराळ हे दरवर्षी ठरलेल्या प्रमाणे आम्ही पार पाडु. चार बहिणी मग काय मज्जाच यायची... सगळ्या मिळून फराळ बनवु.. सॉलिड मज्जा यायची तेव्हा.. स्वतःच्या हाताने चकल्या, करंजा, शंकरपाळ्या हे ठरलेलं असायचं. बाकी लाडु आणि चिवडा बनवायचा तो फक्त आणि फक्त आईनेच...हे सगळं झालं