आघात - एक प्रेम कथा - 25

  • 6.1k
  • 2.6k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (25) दुसऱ्या दिवशी सुमैया भेटलो. ती भेटताच तिचा पहिला प्रश्न होता, ‘‘काय झालं मिळाली काय रुम?’’ ‘‘हो मिळाली.’’ ‘‘किती भाडे म्हणतात?’’ ‘‘दीडशे रुपये.’’ ‘‘कुठे मिळाली?’’ ‘‘रविवार पेठेत साळुंखेंच्या अपार्टमेंटच्या पाठीमागे त्यांच्याच मालकीची एक खोली आहे तिथे.’’ ‘‘मग पैशाचं काय केलंस?’’ ‘‘शंभर रुपये दिले नंतर पन्नास रुपये देण्याच्या अटीवर.’’ ‘‘पाण्याची आणि बाथरुमची वगैरे सोय आहे काय?’’ ‘‘हो आहे.’’ ‘‘दुसरी काही अडचण?” ‘‘तू असल्यावर कसली आली अडचण?’’ ‘‘बरं ठीक आहे. हे घे पन्नास रुपये देऊन टाक घरमालकाला आणि हो विसरलेच बघ, हे चारशे रुपये घे आणि महिन्याभराचं जेवणाचं फिक्स करून टाक कोणत्याही खानावळीत. आता पुन्हा मला