दोन टोकं. भाग ७

  • 13.2k
  • 8.1k

भाग ७विशाखा‌ आता चांगलीच बिझी दिली होती. में महिना, सगळ्यांना सुट्ट्या पण तरीही नेहमीपेक्षा पेशंटस् जरा जास्तीच होते. तिला स्वत:च्या कामातुन वेळच मिळत नव्हता. आता सकाळी ८ ला हॉस्पिटलमध्ये गेले की रात्री १० - ११ वाजायचे तिला घरी यायला. जवळपास पुर्ण आठवडा ती आश्रमात सुद्धा गेली नव्हती. आज शनिवार होता, तसं पटपट काम उरकुन ती आश्रमात जाणार होती कारण काका चांगलेच भडकले होते तीच्यावर. तेवढ्यात काकांचाच फोन आला, तो उचलायचा की नाही याचा विचार करेपर्यंत तर फोन वाजून कट झाला. आपण करायचा तर शिव्या मिळतील त्यापेक्षा थोडा वेळ थांबलं तर काकांचं परत करेल म्हणून ती वाट बघत होती पण नंतर काही फोन