निर्णय - भाग ५ घरी आल्यापासून गप्प गप्प बसलेल्या तिला बघून आईने ताडल की नक्कीच हीच काहितरी बिनसलय. रोज देवाकडे ती सगळं नीट होण्यासाठी प्रार्थना करायची पण तरीही देव काही तीच साकडं ऐकत नव्हता. आज पुन्हा काय नवीन घडलं असावं आणि का...?? आईच्या मायेपोटी तिने हळूच कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. " त्याच्याशी काही बोलणं झालं का..??" पदराला घाईघाईने हात पुसत आईने विचारलं.ती सोफ्यावर तशीच बसून होती....हतबुद्ध..... सर्व जाणीवा हरवल्यासारखी... तिचे डोळे कुठेतरी भिंतीवर रोखलेले होते... कोणत्यातरी विचारांचं जाळं ती गुंफत होती. आईच बोलणं तर तिच्या गावीही नव्हतं.आपल्या लेकीला अस शून्यात हरवलेलं पाहून आईच्या काळजाचाही ठोका चुकला. अशी ती कधीच नव्हती. भग्न वाड्याच्या