प्रेमाच्या आणाभाका - हरवलेलं पत्र

  • 6k
  • 1.5k

प्रिय (गत) सख्या, पत्र लिहिण्यास कारण की, खरे तर तुझ्याशी बऱ्याच गोष्टी मी समोर बोलण्याऐवजी पत्रांमधूनच बोलले आहे. फार आवड मला पत्रांमधून लिहिण्याची... माझ्या भावना मी तुला नेहमी पत्रांमधूनच मांडल्या. तुला आठवते का? आपल्यात भांडण झाले की मी तुला अगदी ४-५ पानांची पत्रे लिहायचे. तुला ही ते आवडायचे... घरच्यांपासून लपून रात्रभर जागून ती लिहिलेली पत्रे तुला द्यायला माझा जीव फार उत्सुक असायचा. पण हे पत्र मात्र तुझ्यापर्यंत पोहचेल की नाही माहित नाही... मी कधी तुला हे पत्र देईल की नाही ते पण मला माहित नाही... आपल्या प्रेमाच्या प्रवासात आपली गाडी डळमळली ती जेव्हा तुझ्या पाकिटात कुण्या दुसरीचेच पत्र पाहिले... कधी आवड असलेल्या