कादंबरी- जिवलगा ...भाग -२५

(25)
  • 15.5k
  • 1
  • 9.8k

कादंबरी – जिवलगा ... भाग – २५ वा -------------------------------------------------------------------- मधुरिमाची कहाणी ऐकून नेहा थक्क झाली . माणसे दिसतात ,तशी नसतात ..हेच दीदीच्या जीवन-कहाणी वरून आपल्याला समजले . मावशीकडे आल्यावर मधुरिमाची ओळख झाली, एकाच घरात राहण्यामुळे सहवास घडत गेला . पण, तिच्या खाजगी ,पर्सनल गोष्टी बादल बोलण्याची कधीवेळ आली नव्हती . मावशी आणि काका रो-हाऊसच्या खालच्या भागात ,आणि एकटीच मधुरिमा वरच्या ३ बी एचके- मध्ये राहायची. मावशी-काकाकडे राहणारी पेइंग –गेस्ट असेल असे बरेच दिवस समजत होतो आपण , नंतर कळाले वरचा भाग काकांनी माधुरीमाच्या मिस्टरांना दिला आहे..आणि कालच्या गप्पात कळाले ..रणधीर काकांचा जवळचा नातेवाईक आहे. नेहाला आश्चर्य वाटत होते की ..मावशी