स्वप्नाचा पाठलाग!-----भाग ३

  • 9.3k
  • 1
  • 4.3k

डॉ. मुकुलनी भडक रंगाच्या वटवाघूळीच्या चित्राचे पुस्तक निनाद आणि स्वराली समोर टाकले. "हे वटवाघूळीच्या लाईफ सायकलवरचे पुस्तक आहे. निसर्गात अनेक प्राणी असतात त्यातलाच हा एक. हा निशाचर प्राणी आहे. म्हणजे आपले भक्ष रात्री शोधतो. त्यात घाबरण्या सारखं काहीच नाही. घोडा, कुत्रा, मांजर असते तसाच हा हि एक प्राणी आहे!" डॉ. मुकुल एकी कडे माहिती सांगत होते, तर दुसरीकडे त्यांचे लक्ष निनाद बसला होता त्याच्या मागच्या भिंतीवरील मॉनिटरवर होते. निनादच्या तर्जनीला लावलेल्या सेन्सरमुळे त्याचे बीपी, प्लस, ईसीजी डॉ. मुकुलना दिसत होते. डॉक्टरांनी वटवाघुळीनची संपूर्ण लाईफ सायकल समजावून सांगितली. बीपी -प्लसमध्ये धोकादायक फरक पडला नव्हता. डॉक्टरांसाठी तो सकारात्मक संकेत होता. मग त्यांनी