आघात - एक प्रेम कथा - 24

(11)
  • 7k
  • 2.8k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (24) यावर सर म्हणाले, जाधव साहेब तुमच्या मुलगीचं आणि प्रशांत कदम नावाच्या मुलाचं प्रेम प्रकरण चालू आहे. ते संबंध कॉलेजभर गाजत आहे. बेधडक कॉलेज परिसरात गप्पा मारत फिरणं, तास रेग्युलर अटेन्ड न करणं,बेशिस्त वर्तन करणं चालू आहे. मान्य आहे, तु ची मुलगी अभ्यासात प्रगतीवर आहे, पण प्रथम क्रमांकाचा मुलगा यावेळी दुसरा, तिसराही क्रमांक मिळवू शकलेला नाही. तो चक्क चार विषयात नापास झालेला आहे. या दोघांनाही सरळ मार्गावर आणणं जरूरीचं आहे. तेव्हा तुमच्या मुलीला ताकीद देऊन बघा. आमच्या परीने आम्ही मुलाला ताकीद करू. कुणाचंही शैक्षणिक नुकसान होता कामा नये. तशी सुमैयाची आई म्हणाली, ‘‘हा! आता