अंकलीकर शितोळे देशमुख ( " सेनाहरदोसहश्री " ) शितोळे घराण्याने आपल्या पराक्रमाने पुणे प्रांताची देशमुखी तसेच पडवी ( ता . हवेली , पुणे ) व अंकली ( ता . चिक्कोडी , बेळगाव ) येथील देशमुखी व पाटीलकीचे वतन मिळविले . पुणे प्रांताचे राजा देशमुख शितोळे आणि अंकलीकर शितोळे या एकाच घराण्याच्या दोन शाखा आहेत . अंकलीकर शितोळे घराण्याचे मुळ पुरुष तमाजीराव यांचे पणतू बाजी शितोळे हे छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी होते.छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येनंतर संताजी , बहिर्जी आणि मालोजी घोरपडे आणि धनाजी जाधव , विठोजी चव्हाण तसेच बाजी शितोळे यांनी औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर हल्ला करून त्याच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून