नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 5 - अंतिम भाग

(12)
  • 16.1k
  • 1
  • 4.6k

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... (5) सांगता सांगता त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ऐकून सगळे सुन्न झाले होते. सूर्य डोंगराआड जाऊ लागला होता. म्हातारा उठला. देवळात समई पेटवली. माठातील थंडगार पाणी प्यायला. सगळ्यांना पाणी दिलं. आणि पुढं सांगू लागला."चार महिनं झालं व्हतं. सारा गाव हळूहळू इसराय लागला. पुन्हा शनी अमावस्येच्या रात्री म्या एकदा झोपायच्या आधी आरश्यात बगत हुतो. तोच वाहिनीसाचा चेहरा आरश्यात दिसला. म्या लय घाबारलो. गप जाऊन झोपलो पर झोप लागली न्हाई. सारखं सारखं त्यो आरसा दिसायचा आणि वाहिनीसावर होणारा अत्याचार. म्या आरश्यात बगायचं बंद केलं. घर सोडलं आन हिकडं देवळात येऊन राहायला लागलू. पर दर शनी अमावस्या