अंधारछाया चौदा मंगला अशी बोलली ही गधडी तडा तडा. मला सुचेना काय करावं! एरव्ही एक थप्पडच ठेऊन दिली असती. असं अद्वा तद्वा बोलली असती ती तर. पण शारीरिक त्रासानं आधीच बेजार त्यात अमावास्याची रात्र! मी ही आवरलं मनाला. बराच वेळ पुटपुटत होती काही काही. मग आम्ही गाद्या टाकल्या. पडलो. तरी मनातून काही केल्या जाईना तिचे बोलणं. काकांनी पाठवली तिला अभ्यास करायला. तब्बेत सुधारायला. पण हिचं हे लचांड निस्तरता निस्तरता आलेत नाकी नऊ. बरं काकांना कळल तर म्हणतील तुला कोणी सांगितलं होते हे नसते धंदे. त्यांचा आधीच भुता-खेतांवर विश्वास कमी. शिवाय जप-जाप्य म्हणजे संतापाने त्यांना तिडीक येते. त्यांना जर हे कळलं