लग्नाआधीची गोष्ट - (भाग 7)

(13)
  • 9.9k
  • 5.2k

निशा विचारते, "हा संजय कोण आता? "सूरज तिला म्हणतो, "सपना चा एक्स बॉयफ्रेंड ". निशा चकित होऊन म्हणते, "पण तू तर आताच म्हणाला होतास ना तीच तुझ्या बरोबर रिलेशन चालू होते. " निशाला काहीच समजत नाही मग ती शांत बसते, पाणी पिते व सूरज कडे बघते. सूरज मघाशी लॉकेट काढून घेतलेल्या बॉक्स मधून काही वस्तू काढतो व तिच्या समोर असलेल्या टेबलवर टाकतो. त्यात एक फोटो, वर्तमानपत्र, डायरी व बर्‍याच वस्तू पडलेल्या असतात. त्यातला एक फोटो काढून तो निशाला देतो आणि म्हणतो हा, "संजय सुतार ". आणि मघाशी तू सपना च्या हातावर टॅटू बघितला तो ह्याच्या नावाचा आहे माझ्या नाही. निशा त्याच्या उत्तरा ला प्रतिउत्तर म्हणून म्हणते, "आणि ते लॉकेट?". सूरज तिला हात करून शांत रहायला सांगतो व पुढे सांगायला सुरुवात करतो. सुरज सांगता झाला- सपनाची सुट्टी जवळजवळ संपत आली. कॉलेजला जाण्याची वेळ आली होती. ती पुण्याला यायला निघाली. महिना दीड महिना दररोज बोलण्याची सवय लागल्याने माझा एकटेपणा पण खूप कमी झाला होता. या काळात मित्रांच्या थोड्याफार लांब गेल्याची जाणीव माझ्या मनाला भासत होती. आता मला परत मित्रांकडेच जावे लागणार होते. कारण ती परत कॉलेज ला गेल्यावर आमचा परत संपर्क होणार नव्हता. मला परत पहिल्यासारखी वाटच बघावी लागणार होती म्हणून मी नाराज होतो. अखेर तो दिवस आलाच जाताना