मधुचंद्राची रात्र - 2

(18)
  • 9.5k
  • 1
  • 4.5k

दुसर्‍या दिवशी सकाळी विजयला जाग आली तेव्हा रात्रभर विचार करुन करुन त्याच डोक जरा जड झाल होत. उठल्यावर जांभई देता देता त्यानी बेडवर पाहील तर रिया बेडवर नव्हती आता मात्र त्याला काळजी वाटू लागली की रिया घरी कोणाला न सांगताच निघून गेली नसेल ना, की तिने मला खरं सांगितल तसच आई-बाबांना पण नाही ना सांगितल सर्व, असे एक ना अनेक प्रश्न आता त्याच्या डोक्यात येऊ लागले. तो पटापट आपले बिछाने आवरून धावत च त्याच्या बेडरूम च्या बाहेर आला त्याने इकडे तिकडे पाहिलं तर आई किचन मध्ये नाश्ता बनवत होती, बहीण कल्पना ही सकाळी सकाळी टिव्हीवर बातम्या लावून बसली होती आणि