निर्णय - भाग ४

(18)
  • 10.9k
  • 1
  • 4.5k

निर्णय - भाग ४पाचेक मिनीटात तिचा फोन वाजला. ती खुशचं झाली आणि का ना होईल, त्याचाच तर फोन होता. आता नक्कीच तारीफ करत बसेल.... बट मी आता त्याचा फोन उचलणार नाही.. लेट का केला त्याने.... आल्यावरच बघू दे..... हेहेहे.….. तिला आवडायचं त्याला अस बेचैन करायला. स्वतःचा लांबलचक घागरा सावरत ती उगाच इकडून तिकडे फेऱ्या मारत राहिली तरी तिची नजर न राहवून फोनकडे जात होती. मनात आणि पोटात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तीच हृदय जोराने धडधड करत होत. सर्वांग एक अनामिक जाणिवेने थरथरत होत. " काय म्हणतायत आमच्या सुनबाई...??" दरवाजातून त्याच्या आईने प्रवेश केला. हिरव्या निळसर कॉम्बिनेशनची ही सिल्कची साडी तिने मुद्दाम