माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 20

  • 7.2k
  • 2
  • 3.7k

२० विरहाग्नी! काकाने मला सगळ्या कामाला लावून माझा मामा केला. कामाचे काही नाही पण आधीच मर्यादित वेळात वै शी बोलू कधी आणि पुढे करावे तरी काय? रात्र थोडी सोंगे फार म्हणतात तसा आधीच वेळ थोडा आणि त्यात आता ती भेटणारही नाही विशेष. लग्न लागले की झटकन् उडून जाईल अमेरिकेत. नि मग तिचा काॅन्टॅक्टही नाही. आणि मी स्वत:ला ओळखून तर आहेच. मी काही जास्त हातपाय हलवणार नाही. मग पुढचे काय? तिच्याशी बोलायला हवे. त्यासाठी ती भेटायला हवी. त्याकरता वेळ हवा. वेळ मिळाला तरी अर्थात पुढच्या दोन दिवसांत होणारे काम नाहीच ते. पण किमान एक आयडिया .. जो जिंदगी बदल