ठाणे स्टेशनवर पोहोचताच मी धावत प्लॅटफॉर्मवर नंबर पाचवर जाऊन उभी राहिली. तेवढ्यात पुण्याला जाणाऱ्या ट्रेनची घोषणा झाली. कोणत्याही क्षणात ट्रेन येण्याची ती घोषणा होती. मी तय्यारच होते जसे यौध्ये जायचे ना लढायला त्याच पध्दतीने मी देखील ट्रेनमध्ये चढायला तय्यार होते. तोच पुण्याला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. सगळे चढले म्हणून मी देखील चढले. ती ट्रेन देखील लगेच सुरू झाली. त्या डब्यात उभं राहायला ही जागा नव्हती आणि माझा बॉस नाचून सांगत होता त्या ट्रेन ने जाशील तर झोपून जाशील. एवढा राग येत होता काय सांगू. मग कानात हेडसेट टाकून गाणी ऐकत उभी राहिली. त्यात तो ट्रेनमधल्या बाथरूमचा वास जीव नकोस करत